एक पत्र छकुलीस

  • 9.6k
  • 2.7k

एक पत्र छकुलीस!माझी लाडकी छकुली,खूप खूप आशीर्वाद! छकुली! हा शब्द उच्चारताच शरीरात एक वेगळीच अनुभूती संचारते. लहानपणी पाळण्यातील तुझ्या बाललीला पाहून माझ्या तोंडातून उत्स्फूर्तपणे 'छकुली' हा शब्द बाहेर पडला. तू जसजशी मोठी होत होती तसतसे तू सारे घर व्यापून टाकताना ते प्रेमळ नावही माझ्या तोंडातून येत गेले. तू शैक्षणिक यशाचे एक-एक शिखर सर करीत असताना प्रत्येक वेळी मला आसमान ठेंगणे होत गेले. एक अनमोल ठेवा मला गवसत असल्याची जाणीव समाधान देत गेली. एखाद्याने झोपेतून उठवून मला तुझे नाव विचारले तर मी पटकन