महती शक्तीपिठांची भाग ५

  • 7k
  • 2
  • 2.7k

महती शक्तीपिठांची भाग ५ १९)त्रिपुरा - त्रिपुरा सुंदरी शक्तीपीठ त्रिपुराच्या उदयपूर जवळ राधाकिशोरपूर गावात आईचा डावा पाय खाली पडला. इथे आईचे रूप “त्रिपुरासुंदरी “असुन सोबत शिवशंकर “त्रीपुरेश “रुपात विराजमान आहेत . हे शक्तीपीठ त्रिपुरा आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर आहे . महाविद्या समाजात त्रिपुरा नावाच्या अनेक देवी आहेत , त्यापैकी त्रिपुरा-भैरवी, त्रिपुरा आणि त्रिपुरा सुंदरी विशेष उल्लेखनीय आहेत. देवी त्रिपुरासुंदरी म्हणजे ब्रह्मा स्वरूप, भुवनेश्वरी विश्वमोहिनी. तीच देवी, महाविद्या, त्रिपुरसुंदरी, ललितांबा इत्यादी अनेक नावांनी आठवतात. शक्ती संप्रदायात त्रिपुरासुंदरीला एक विलक्षण महत्त्व आहे. दक्षिण-त्रिपुरा उदयपूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर, राधा किशोर गावात माताबाढि पर्वत शिखरावर उदयपूर शहराच्या दक्षिण-पश्चिमेस राज-राजेश्वरी त्रिपुर सुंदरीचे भव्य मंदिर