रेशमी नाते - ३

(51)
  • 36.6k
  • 2
  • 26.1k

पिहु आवरुन किचन मध्ये येते. सुमन:- ये बाळा,आज पुजा कर ...मग काहीतरी गोड कर तुला जे बनवता येते ते कर...ये तुला देवघरात कशी पुजा करतात ते सांगते... पिहु:- हम्म ...पिहु पुजा करायला घेते.ती जप म्हणत सगळे देव धुवुन कोरडे करते .सगळ्या देवांना गंध लावते...छान फुलांनी सजवते छोटीशी वृदांवनची रांगोळी काढते.दिवा धूप अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता.. आजी :- किती छान पुजा करते गं सुमन ‌.. सुमन:- हसत)हो ना आई ..मी काहीच सांगतिले नाही.‌आणि रांगोळी किती छान काढली.पुजा बघुन मन प्रसन्न झाले. पिहुने घंटी वाजवुन शुक्रवार असल्याने गणपतीची,मग महालक्ष्मीची आरती म्हणून संगळ्यांना आरती दिली. विराट आवरुन खाली आला . रोहिणी:- पिहु आरतीच