लक्ष्मी - 3

  • 21.6k
  • 1
  • 14.6k

कादंबरी लक्ष्मी भाग तिसरा मोहनची नोकरी दहावी पास झालो आता पुढे काय करावं ? हा प्रश्न मोहनला सतावत होता. सर्वत्र प्रवेश प्रक्रिया चालू झाली. मोहनचे सर्व सोबती कॉलेजला प्रवेश घेतले होते तर काहीजण आय टी आय ला गेले होते. दोन-तीन दिवसांनी मोहन अकरावी आर्टस मध्ये प्रवेश घेण्याचा निश्चित केला. सायन्सला प्रवेश घे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावले पण त्याची आर्थिक परिस्थिती अशी होती की त्याला इच्छा असून देखील तो सायन्सला प्रवेश घेऊ शकला नसता. नाईलाजस्तव त्याने आर्टसमध्ये इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन प्रवेश केला. कॉलेजला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस कॉलेजमध्ये गेला आणि कोणत्या विषयाला कोणते शिक्षक आहेत ?