कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 20 वा

  • 6.3k
  • 2.6k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग – २० वा ------------------------------------------------------- सागर देशमुख – हे प्रोजेक्ट सुरु करून अनुशाला आता तीन आठवडे झाले होते पुढचा आठवडा झाला की ..एक महिना पूर्ण होणार ..म्हणजे ..येणारा एक महिनाच खर्या अर्थाने सगळे काही करण्याचा महिना असणार आहे ..नाही तर .. इतका खटाटोप करून हाती काहीच लागले नाही ,असे व्हायला नको.. या सगळ्यात एक गोष्ट मोठ्या समाधानाची घडत होती .. ती म्हणजे ..सागर देशमुख स्वतहाहून - अगदी मोकळ्या मनाने तिला आपल्या यशाची आणि अपयशाची कहाणी सांगत आहेत , त्याच बरोबर मोठ्या खुबीने आपल्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ या बोलण्यात अजिबात येणार नाहीत याच काळजी घेत