अहमस्मि योधः भाग - ६

  • 11.6k
  • 4.5k

ठरल्याप्रमाणे समीर आणि दिग्या पान टपरी जवळ पोहोचतात..तिथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दिग्याचा मित्र अनिल, जो हॉस्पिटल मध्ये वॉर्ड बॉय असतो तो त्यांचीच वाट बघत उभा होता..पटकन दोघं जाऊन त्याच्यासमोर उभे राहतात.. " चल..सांग लवकर काय माहिती मिळाली ??" - दिग्या उत्सुकतेने त्याला विचारतो.. " तसं त्याला मी आधी खूप वेळा पाहिलंय. त्याचं नाव धोंडीबा असं काहीतरी आहे..तू म्हणाला म्हणून मी चोरून त्याचे रिपोर्ट्स पाहिले..दोन वर्षांपूर्वी आमच्याच हॉस्पिटल मध्ये चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी झाली होती.. ( प्लास्टिक सर्जरी ही शल्यक्रिया आहे ज्यामध्ये मानवी शरीराचा जीर्णोद्धार, पुनर्रचना किंवा बदल यांचा समावेश आहे. ) अधून-मधून चेकअप साठी येत असतो तो.." - अनिल गंभीर स्वरात