एका वृक्षाचे मनोगत....!

  • 25.4k
  • 4.8k

एका वृक्षाचे मनोगत......! नमस्कार सर्व मानव जातींना. मी एक झाड बोलतोय. या पृथ्वीवर सर्व मानवजातीला, सर्व प्रकारच्या वृक्षांच्या प्रजातींना, सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातींना, पक्षांना आणि जैवविविधता राखणाऱ्या घटकांचा समान अधिकार आहे. पण आज माझ्यासारख्या झाडांचे, प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते पण एका मानव जातीमुळे. मानवांनी या सृष्टीवर अधिराज्य गाजविण्याचा स्पर्धेत आम्हा झाडांना नामशेष करण्याचे धोरण मानव राबवित आहे. पृथ्वीच्या नैसर्गिक सौंदर्याला आज कुठेतरी खीळ बसत आहे. ‎ मी एक झाड म्हणून बोलताना सतत माझ्या मनात प्रश्न येतो की, आम्ही सर्व प्राणी, पक्षी, जीवजंतू या काळ्या आईचे लेकरेच आहोत न ! पण आम्हीच सर्व पृथ्वीला समतोल राखण्याचा प्रयत्न