प्रेम खरंच असतं का?...

  • 15.1k
  • 5.2k

आज मला लवकर ऑफिसला जायचं होतं. ऑडिट होणार होतं ऑफिस मध्ये आणि काम खूप पेंडिंग होतं म्हणून आज मी मुद्दामच आवरून लवकर निघालो होतो आणि लवकरची बस पकडली होती. बस बऱ्यापैकी रिकामी होती. अजिबात गर्दी नव्हती मला आरामात बसायला जागा मिळाली होती. तेवढ्यात मला एक मुलगी बसमध्ये पाठमोरी उभी असलेली दिसली. सडपातळ असा बांधा, तिचे सैलसर वेणी घातलेले लांबलचक केस. फिक्कट निळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातला होता तिने. खूपच साधा असा तिचा अवतार होता. तरीही ती पाठमोरी इतकी आकर्षक दिसत होती. माझ्या आजूबाजूला बसलेले अगदी सगळेच तिला मागून बघण्यात गुंग होते. होतीच ती इतकी आकर्षक. अचानक बसचा ब्रेक लागला आणि सगळे