इस्कोट - नवं घर

  • 5.6k
  • 1.7k

सकाळी नऊच्या सुमाराला एस्टी गावात येऊन धडकली. खांद्यावरची खचाखच भरलेली बॅग कशीबशी दरवाज्यातून बाहेर काढताना एकदोनदा हेंदकाळत माधव खाली उतरला. एसटी आली तशी निघून गेली. माधवने पॅन्टच्या खिश्यातुन सफेद रुमाल बाहेर काढला आणि चेहऱ्यावरची धूळ साफ करत पुढं चालू लागला. माधवचे खांदे नेहमी झुकलेले असत, त्यामुळे चालताना तो पोक काढलेलाच दिसे. जणू घरसंसाराचा भार त्याला सदानकदा दाबत असे. म्हणूनच येन चाळिशीतच माधव बराच थकलेला वाटे.वेळ सकाळची असली तरी उन्हाची तिरपी किरणे अंगाला बोचत होती. स्टँडजवळच एक भलंमोठं पिंपळाचं झाड होतं, त्याखाली बांधलेल्या पारावर दोन-चार म्हातारी टाळकी दिसत होती. 'म्हमईकडनं' कुणी घरातलं आलं की घ्यायला म्हणून अथवा इतर काही कारणांसाठी