राखी- एक पवित्र बंधन

  • 4.9k
  • 1.2k

"दीपा, आजकाल तु खुप उदास असतेस. तुझे काहीतरी बिनसले आहे हे माझ्या लक्षात आले आहे. पण काय तेच कळत नाही. तुला आईची आठवण येते का? घरी जायचे आहे का?" अभिजीतने काळजीपूर्वक विचारले." तसं काही नाही रे अभी, आईची तर रोजच बोलणं होतं. पण माझे मलाच कळत नाहीये की मला नक्की काय होत आहे. आयुष्यात एक वेगळीच पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते आहे." दीपाने उदासपणे उत्तर दिले.दीपाच्या मनाला काहीतरी खटकते आहे हे अभिजितला कळत होतं. पण नेमकं काय झालं आहे याबद्दल खूप विचार करूनही त्याला कारण सापडत नव्हतं.वास्तविक दोघांचे लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते. दीपा आणि अभिजीत एकाच ऑफिसमध्ये कामाला