तू जाने ना - भाग ६

(15)
  • 13.5k
  • 1
  • 7.4k

भाग - ६रिसेप्शनला स्टेजवर दोघांनी एकत्रच जाऊन काव्या आणि पंकजसोबत फोटो काढले... संपूर्ण लग्न समारंभात त्या दोघांची जोडी इतकी छान दिसत होती की फोटोग्राफर ने त्यांच्या कळत नकळतच त्यांचे बरेच फोटो काढले... लग्न निर्विघ्नपणे पार पडलं... सगळे परतीच्या प्रवासाला निघाले... कबिरने सुहानीला विचारून एकच कॅब बुक करून ठेवली होती... कारण त्या दोघांचं रिटर्न तिकीट पण एकाच फ्लाइटचं होतं... " माझ्यासोबत यायचंय ह्याला माय फूट...? इथून निघशील तर येशील ना...! मला त्रास देणारा आता स्वतःचं पोट धरून त्रास सहन करत बसणार...? " सुहानी स्वतःचे कपडे बदलताना हा एकच विचार करत होती... तिने तरीही मुद्दामून त्याला निघायचं का हे विचारायला कॉल केला पण