व्हाईट कोट सिन्ड्रोम एक नवीन नाव, एक नवीन आजार अनिलला माहित पडला, हायपोकॉन्ड्रियाक माणसाचं आणखीन एक वैशिष्ट्य असत त्यांना कुठल्याही आजाराच्या तळा गळाशी जाऊन त्याची माहिती घेण्याची सवयी असते आणि आज कालच्या इंटरनेट युगात हि माहिती इंटरनेटवर खूप सहज आणि मोफत उपलब्ध असते, आणि अश्या माहिती शोधण्याच्या सवयीचा त्यांना फायद्या पेक्षा तोटाच जास्त असतो, कारण इंटरनेट वर जी माहिती असते ती बहुतांशी वेळा खूप वाढवून चढवून आणि आजाराला खूप मोठं करून लिहलेली असते आणि त्या मुळे डोक्यामध्ये माहिती पेक्षा भीतीच खूप भरली जाते, म्हणून अश्या पेशन्टने इंटरनेट वरील माहिती वाचणं टाळणं आणि काहीही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर आपल्या डॉक्टरला