होय, मीच तो अपराधी - 1

  • 11.2k
  • 2
  • 5.4k

(१) होय, मीच तो अपराधी! न्यायालयाचे ते दालन खचाखच भरले होते. एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी त्यादिवशी होणार होती. उपस्थितांमध्ये तरुणाई आणि त्यातच मुलींची संख्या अधिक होती. तो खटलाही एका पीडित मुलीच्या संदर्भात होता. त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास पकडून न्यायासनासमोर उभे करण्यात आले होते. "होय, मायलॉर्ड, होय! या तरुणीवर मीच बलात्कार केलाय. माझ्या हातून घडलेल्या घोर अपराधाबद्दल मी शिक्षेस पात्र आहे. मला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. मला फाशीची शिक्षा द्यावी. मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे परंतु मी चूक केलीय असे मला वाटत नाही..." तो तरुण न्यायालयाच्यासमोर निर्धाराने म्हणाला. त्याचे बोल ऐकून उपस्थित सारे आश्चर्यात पडले. सरकारी