कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा

(23)
  • 15.9k
  • 8.8k

कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा --------------------------------------------------- रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपले ..सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या . ओप लागे पर्यंत गप्पा करीत पडायचे आणि त्या भरात एकेकजण झोपी जायची . गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर . गावाकडे घरी बोलून झाले की ..नेहा गप्पा करण्यात नावापुरती सहभागी असायची .आणि सगळ्यात अगोदर तिलाच झोप लागायची ,मग अनिता आणि सर्वात शेवटी सिनियर –काळजी घेणारी सोनिया झोपी जात असे. आज मात्र नेहाने गप्पांना सुरुवात केली ,असे अनिता आणि सोनिया आश्चर्याने म्हणाल्या .. अरे वा ..नेहाराणी , तू कशी काय जागणार आमच्या सोबत ? तुझी विकेट तर सगळ्यात आधी पडते . झोप उडायला काय