अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 1

  • 10.9k
  • 4.8k

(१) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? वामनराव बैठकीत टीव्हीवरील बातम्या बघत बसले होते. डोळे जरी टीव्हीवर लागलेले होते तरी लक्ष कुठे अन्यत्र होते. चित्त जणू थाऱ्यावर नव्हते. एक औदासिन्य शरीरभर पसरले होते. काही तरी वेगळं घडलंय असेही नव्हते. रोजचे दिनमान नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत वयोमानाप्रमाणे होणारे आजार सोडले तर बाकी सारे व्यवस्थित होते. मग त्यांची मनःस्थिती तशी का झाली होती? भविष्यात काही वेगळे काही वाढून ठेवले नव्हते ना? एखाद्या संकटाची तर चाहूल लागली नव्हती ना? वामनराव आणि त्यांची