स्पर्श - भाग 5

(24)
  • 24.1k
  • 2
  • 15.5k

त्या क्षणानंतर आयुष्याने थोडीशी पलटी घेतली ...मस्तीचे दिवस संपले आणि आता वेळ होती पेपरची ..दररोज येणारे सेमिनार , वायवा , सबमिशन्समुळे सर्वच व्यस्त झाले ..एक गोष्ट झाली की दुसरी यायची ..कॅन्टीनला सुद्धा फारच कमी वेळ भेटत होता ..कॉलेजच्या कॉलेजला राहून हाय बाय एवढंच बोलत होतो ..अभ्यासामुळे माझ्यावरचीही प्रेमाची नशा कुठेतरी दूर उडून गेली होती ..मी तसा बाकी वेळ सिरीयस नसलो तरीही पेपरच्या वेळी फार सिरीयस असायचो ..त्यातल्या त्यात कधी नेहा , मानसीला अभ्यासबद्दल मदत करावी लागायची त्यामुळे तेवढं काय तर भेटणं व्हायचं ..एक तर प्रेमाच्या चक्करमध्ये रात्रभर झोप नव्हती लागत त्यामुळे बराच अभ्यास करायचा बाकी होता ..मीही तेवढ्याच