तू जाने ना - भाग २

  • 19.6k
  • 12.6k

मागील भागात -पण त्या परिवारात अनावधानाने शामिल व्हायला आलेला तो कबीर... तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग, तिचं न भूतो न भविष्यति असणारा तिचा एकेकाळीचा प्रियकर... हो प्रियकर... जो आपल्याला प्रिय असतो त्यालाच प्रियकर बोलतो ना आपण...!______________________________________तू जाने नाभाग - २असाच एक कबीर नावाचा प्रियकर जेव्हा तिच्या आयुष्यात आला आणि आयुष्यातला सगळा खेळच बदलला... कामाशिवाय कशालाच महत्व न देणारी सुहानी कशी काय त्याच्या प्रेमात पडली, हे आजवर ना राहुलला समजलं, ना रितूला... मालिकांच्या माध्यमातून लोकांच्या मनात प्रेम, मोह, माया, निर्माण करणाऱ्या सुहानीच्या स्वतःच्या हृदयात मात्र कधीच इतरांना द्यायला प्रेम नव्हतं... प्रेमात पडायला समोर माणूस पण तसाच लागतो म्हणा... हो, कबीर होता