परवड भाग 4

(13)
  • 11.3k
  • 1
  • 5.9k

भाग 4.... आपली प्रिय पत्नी सीता हे जग सोडून गेल्यानंतर अरविंदावरची जबाबदारी अजुनच वाढली. आपल्या आईच्या अकाली मृत्यूनंतर वांड गुणवंताही थोडा सुधारल्यासारखा वागत होता. आजकाल स्वत:हून तो घरातली जमतील ती कामे करायला लागला होता.एकामागोमाग एक संकटे येत होती अशा परिस्थितीतही गुणवंतामधे झालेला हा सकारात्मक बदल ही अरविंदासाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाजू होती. गुणवंता आता शहाण्यासारखा वागायला लागलाय या विचाराने सीतेच्या जाण्याचं दु:ख नाही म्हटलं तरी थोडंस बोथट झालं होत. हल्ली दोघे मिळून सकाळी लवकर उठून घरातली कामे भराभर उरकत होते. वसंताचं सगळ उरकेपर्यंत कामावर जायची वेळ व्हायची.अरविंदा एकदा कामावर गेला की दिवसभर वसंताबरोबर गुणवंताच थांबायचा.त्याला हवं नको