वाचलास रे वाचलास ( भयकथा- एका प्रवासाची )

  • 9.3k
  • 2.7k

तो जुलैचा महिना होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. विश्वास कांबळे नावाचा तरुण, नुकतीच त्याची बदली कोल्हापूरला झाली होती. तो कोल्हापूर मध्ये क्लार्क या पदासाठी नोकरी करत होता. मूळचा तो राहणारा सातारचा. काही दिवस सुट्टीसाठी तिकडे गेला होता. काही कामानिमित्त त्याला कोल्हापूरला लगेचच जावे लागणार होते. त्याच्या मनात काही तरी विचित्र भावना निर्माण होत होत्या. त्याचे आई-वडील ही त्याला एवढ्या रात्री नको जाऊस अशी विनंती करत होते. पण काम खूपच महत्त्वाचे असल्या कारणाने त्याला जावे लागणार होते. तरी त्याचे मनही भयभीत झाले होते. काही तरी विचित्र घडेल अशी पुर्व सूचना त्याच्या मनात निर्माण होत होती. रात्रीच त्याने जाण्याचा निर्णय घेतला.