शेतकरी माझा भोळा - 13

  • 7.7k
  • 2.7k

१३) शेतकरी माझा भोळा! पांदीहून आल्या आल्या यस्वदा गणपतला म्हण्ली, "अव्हो,सम्दे लोक कपासीच्या थैयल्या आणाय चाललेत. तुमी बी जाता का? न्हाई तं ऐक करा...""कसं करु सांग. आता तू सांगावं आन् म्या आयकावं...""बर! बरं!। लै आले आईकणारे. आस्स करा, पैयले कोन्ला तरी ईच्चारा आन् मंग जा." "बरं..." आस्सं म्हणत जरा वेळानं गणपत तात्यासायेबाकडे गेला. रामराम करत म्हन्ला, "मालक, कपाशीची कोणती जात चांगली?""का रं?""औंदा सरकी लावावं म्हन्तो.""चांगली गोस्ट हाय की. जिमीन पडीक ऱ्हाण्यापरी काही बाही घेतलंच पायजे ""मंग येक सांगा, येच्च फोर चांगला की डब्बल फोर?""त्याच