गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा

(21)
  • 21.6k
  • 5.6k

गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांची सांकेतिक भाषा. शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर सरदार बहिर्जी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा समजलं जातं कारण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया गुप्तहेरांनी दिलेल्या योग्य माहितीमुळे जिंकल्या.त्यात बहिर्जी नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली.त्यांना हे शक्य झालं ते त्यांनी कसबीने वापरलेल्या कौशल्यामुळे अडचणीच्या ठिकाणी वापरलेल्या सांकेतिक खानाखूना, सांकेतिक इशारे आणि मुख्य म्हणजे सांकेतिक भाषा. बहिर्जी नाईक वेगवेगळ्या प्रांतांत फिरत त्यामुळे त्यांची बाकी गुप्तहेरांसोबत बोलण्यासाठी आणि इतरांना न समजण्यासाठी एक वेगळीच भाषा निर्माण केली.त्या भाषेला 'पारूशी' भाषा म्हणतात.या पारूशी भाषेच्या किमयेमुळे बहिर्जी त्यांच्या कारकिर्दीत एकदाच ओळखले गेले.तेही जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना