मुका विठ्ठल

  • 8.9k
  • 2.6k

"मुका विठ्ठल "चुलीत दोन चार लाकड़ आणखी सरकवुन म्हातारीने तिच्या त्या पोचे गेलेल्या पातेल्यात चहा उकळाय ला ठेवला. उकळत राहणारया चहा प्रमाणे च म्हातारीच मनही आतुन आतुन ढवळून निघत होत...तिन दिशेला गेलेले तिचे तीन पोरं. त्यातला धाकला तिला सोड़ायचा नाही पण सगळयात मोठा अन मधला गेले होते सोड़ुन. पण आज खुप वर्षानी तीचा मोठ्ठा सायेब झालेला पोरगा आज घरी येणार होता. खर म्हणजे पोटचा गोळा घरी येणार म्हणून म्हातारी खुप आनंदात होती पण मनातुन धास्तावलेली. त्याला कारणही तसच होत म्हणा. जमीनजुमला,शेतीवाड़ीच काय ते निपटुन टाकायचे म्हणून हे पोरग वस्तीवर येणार होत असं तिला धाकला बोलला होता .धाकला बाकी समजुतदार धोरणी