अहमस्मि योध: भाग - ३

  • 12k
  • 5.2k

स्वतः ला सावरत समीर गाडीच्या बाहेर आला. अंधारात जी आकृती त्याच्या गाडी समोर तयार झाली होती ती आता नाहीशी झाली होती. समीरला दरदरून घाम फुटला होता.. सगळं एकदम अंधुक होतं आणि काही क्षणांनी थोडं फार दिसू लागतं. वयस्कर होते कोणीतरी पण तरीही ताठ उभे होते. छातीपर्यंत येणारी पांढरी झालेली दाढी आणि तितकेच लांब केस , बळकट स्नायू..गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि डोक्यावर भले मोठे शिवगंध रेखाटलेले... ७ ते ८ फूट उंचीचे ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यांनी सफेद रंगाचा पेहराव केला होता. " समीर , ये आमच्या समोर येऊन उभा राहा.." - ती व्यक्ती म्हणाली. " क...कोण..आहात तुम्ही..तुम्हाला माझा नाव कसं