उलट्या पायांची म्हातारी - भाग चार

(19)
  • 26.7k
  • 15.3k

म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय भ्या वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल.