कादंबरी- जिवलगा .भाग -२६

(27)
  • 16.9k
  • 3
  • 9.5k

कादंबरी –जिवलगा.. भाग -२६ वा ------------------------------------------------------------------------- मधुरीमाला परदेशी जाऊन दोन आठवडे झाले होते . सोनिया आणि अनिता सोबत राहण्याची कल्पनां प्रत्यक्षात आली होती . तिघी आता सतत सोबत ..ऑफिसमध्ये आणि ऑफिस संपल्यानंतर सुद्धा सोबत . त्यामुळे एकमेकींच्या सहवासात वेळ आणि दिवस कसा जातो आहे ते कळत नव्हते . नेहा रोज रात्री तिच्या आई-बाबांशी बोलून सगळी खबरबात जाणून घेऊन मगच झोपायची . इकडे आल्यापासून ती एकदाही गावाकडे गेलेली नाही ..घर सोडून ,आई-बाबंना सर्वांना सोडून राहण्याची नेहाची ही पहिलीच वेळ , त्यामुळे या सगळ्यांची आठवण झाली की तिला रडू येते हे आता सोनियाला –अनिताला माहिती झालेले होते . त्यामुळे दोघी नेहाला चिडवत