तिला चाफा आवडायचा

  • 10k
  • 2.6k

होय..! तिला चाफा आवडायचा आणि आजही अगदी तितकाच आवडतो.म्हणूनच तर आज सकाळी मुद्दामच लवकर उठलो.उठल्या उठल्या आम्ही दोघांनी मिळून लावलेल्या त्या अंगणातल्या चाफ्याच्या झाडाची फुलं तोडली आणि तिच्या पुढ्यात आणून ठेवली आणि मग नेहमीप्रमाणे तिच्या त्या सुंदर डोळ्यांमध्ये पुन्हा हरवून गेलो.मग नकळतचं बर्याच वर्षांपूर्वी झालेली आमची पहिली भेट आठवली....! त्या दिवशी ऑफिसचा पहिलाच दिवस त्यात घरातून निघायलाही खूप उशीर झाला होता.आता बस ने गेलो तर अजून उशीर होईल म्हणून टॅक्सीसाठी टॅक्सी स्टँड वर गेलो.पण तिथे एक ही टॅक्सी भेटली नाही.तेवढ्यात पावसानेही चांगलाच जोर धरला.समोरून एक टॅक्सी येताना दिसली मी पळतपळत जाऊन त्या टॅक्सीला अडवलं आणि दरवाजा उघडून आत मध्ये