तारेवरची कसरत - १

  • 9.9k
  • 3.3k

तारेवरची कसरत – १ (वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा) (अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.) आज रोहिणीला जाऊन पंधरा दिवस झाले. दशक्रियाविधी मी शास्त्राप्रमाणे पूर्ण केले. ती इतक्या लवकर मला सोडून जाईल असे मला कधीच वाटलं नव्हतं, त्याला कारणही तसंच होतं. तिला कधीच कसलाच आजार नव्हता, साधी बीपीची गोळी सुद्धा तिला कधी लागली नाही. पण जिन्यावरून पडायचे निमित्त झालं आणि दोनच दिवसात ती मला सोडून या जगातून निघून गेली. आमच्या