सोकॉल्ड लव्ह - १

  • 6.6k
  • 2
  • 3k

लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी...तो आज ही आलेला. पण एकटाच. दुरवर पसरलेल्या समुद्रामध्ये हरवलेला. डोक्यात ना कसले भाव होते, नाही चेहऱ्यावर हसु. एकटक शांतपणे तो वाळुमध्ये बसुन होता. दूरवर पसरलेल्या समुद्राला बघत. चौपाटीवर वारा वाहत होता. रोज तोच वारा जीवाला शांत करणारा ठरत असला तरी आज मात्र तोच वारा नकोसा झालेला.हळु- हळु सूर्याचे साम्राज्य संपत, त्यावर काळोखाने मात केलेली. जसा सूर्याने समुद्रात उडी घ्यावी तसच काहीसं वाटत होतं. तो त्या जाणाऱ्या सूर्याकडे आपले डोळे लावून बसलेला. जसा सूर्यास्त झाला, याने ही आपले डोळे बंद केले आणि अचानक पाणी गालावर येऊन