चिनू - 4

  • 10.7k
  • 5.6k

चिनू Sangita Mahajan (4) रकमाला थोडे हायसे वाटते, कारण इतके दिवस एकटीच बिचारी घुसमटत होती. तिसऱ्या दिवशी घरमालक येतो पैसे न्यायला लगेच रकमा पोलिसांना इशारा करते, पोलीस लक्ष्य ठेऊनच होते. लगेच ते घरमालकाच्या भोवती गोळा झाले. घरमालक पण थोडा गोंधळला. "मी इन्स्पेक्टर देशपांडे, मला सांग हे घर भाड्यानं कोणी घेतलं होतं? आणि खरं खरं सांगायचं, काही होशियारी नाही करायची." देशपांडे आपली ओळख देत बोलले. "साहेब मी त्याला ओळखत नाही पहिल्यांदाच बघितला त्याला." घरमालक म्हणाला. "त्याची काही कागदपत्र वगैरे आहेत का?" देशपांडे. "नाहीत" घरमालक. "काही चौकशी न करता घर कसं दिलं भाड्याने? बरं त्याचे वर्णन करू शकता ना?" देशपांडे. "हो साहेब"