उलट्या पायांची म्हातारी - भाग तीन

(19)
  • 29.7k
  • 16.7k

“आता अजून एक गोष्ट ऐका.” आज्जी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आज्जीने गोष्टीला सुरुवात केली-ही गोष्ट आहे साताऱ्यात राहणाऱ्या बबन म्हात्रेची. बबन लहानपणापासूनच फार धाडसी होता. मिलिटरीत जाऊन देशसेवा करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याची उंची बेताचीच होती त्यामुळे त्याला मिलीटरीत प्रवेश मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून वाचूनच तो मोठा झाला होता. त्याला शिक्षणात फारसा रस नव्हताच. मैदानी खेळात मात्र तो पटाईत होता. खोखो, कबड्डी आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ होते. शाळेत असताना तो ज्या कोणत्या टीमकडून खेळायचा त्या टीमचा विजय निश्चित असायचा. मग खेळ कोणताही असो. पाहता पाहता बबनचं शालेय शिक्षण संपलं. कॉलेजातही त्याने कसंबसं