प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 5

  • 9.9k
  • 4k

क्रमशः५.मी - " हा बोल भाऊ, दादांच्या फोनवरून कसा काय फोन केलास ?."भाऊ - " आरं... दादास्नी दवाखान्यात घेऊन निघालोय."जेवताना माझ्या हातातला घास कधी गळून पडला, समजलंच नाही. क्षणार्धात अंगातून वारं निघून जावं, अशी माझी अवस्था झाली. तोंडातून शब्द फुटत नव्हता. पुन्हा तोच बोलला, " खेराडला आलोय. सरकारी दवाखान्यात."मी - " का ? काय झालंय ? "भाऊ - " दुपारपासून पोटात दुखत होतं. गावातल्या क्लिनिकमध्ये चार वाजता इंजेक्शन करून आलो. दोन तीन बरं वाटलं आन्‌ परत दुखायला लागलं. "मी - " आरं, मग खेराडला कशाला जायाचं ?"भाऊ - " आपल्या गावात कुठं दवाखाना आहे ? "मी - " एवढं मोठं