उलट्या पायांची म्हातारी - भाग दोन

(14)
  • 29.8k
  • 19.5k

“घाबरू नका रे बाळांनो. कितीतरी वर्षांनी आज या बंगल्यात तुमच्या सारख्या मुलांचा पाय पडला.” असं म्हणून ती म्हातारी रडू लागली. समोरचं दृश्य तिघांसाठीही अनपेक्षित होतं. सनीला तर त्याच्या आज्जीची आठवण झाली व त्या आठवणीने त्याचेदेखील डोळे पाणावले. आता बाहेर पाऊस पडू लागला होता. “तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का?” म्हातारीने प्रश्न केला तसा तिघांनीही एका सुरात उत्तर दिलं “होssssss” “घाबरणार नाही ना?” म्हातारीने पुन्हा प्रश्न केला. यावर आधीच भ्यायलेला विनू काहीतरी बोलणार होता इतक्यात सनीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला नजरेनेच गप्प केलं. “नाय भिनार आज्जी तुमी सांगा गोष्ट. पन येक ईचारु का?” सनी म्हणाला. “विचार की?” असे म्हातारीने म्हणताच सनीने मनातील