स्वप्नाचा पाठलाग!-----भाग २

  • 8.1k
  • 1
  • 3.1k

"स्वराली, मी तुम्हाला मुद्दाम एकटीला बोलावलंय. काही गोष्टींचं स्पष्टीकरण आणि निनादच्या मानसिक अवस्थे संबंधी तुमच्याशी चर्च्या करायची आहे." डॉ. मुकुल निनादचे केस पेपर पाहत म्हणाले. "बोला डॉक्टर." स्वराली डॉक्टरांचा गंभीर टोन एकून अस्वस्थ झाली होती. "प्रत्यक माणसाला कशाची ना कशाची भीती वाटतच असते. त्यात काही वावगं नाही. एका ठराविक मर्यादेपर्यंत 'भीती' हे नैसर्गिक कवच असते. कारण ते धोक्याची सूचना देत असते. पण हीच भीती जेव्हा मर्यादेबाहेर जाते तेव्हा, तो 'फोबिया' होतो. ""डॉ. मला तुमच्या शास्त्रातलं काही कळत नाही! मला फक्त निनादला काय झालाय, तेव्हडंच सांगा!" स्वरालीला डॉक्टरांच्या प्रस्तावनेत काही रस नव्हता. "निनादला 'चिरोपट्ट फोबिया ' झाला असावा असा माझा अंदाज