सफेद रंगाच्या त्या कुर्त्यामध्ये खुललेलं तीच सौंदर्य त्यात आताच आंघोळ करून आल्याने अजून ही ओले असलेले तिचे केस तिच्या त्या चेहऱ्यावर येत होते. हलकं ऊन असल्याम त्या सोनेरी किरणांमध्ये तिचा तो चमकणारा चेहरा मला वेड लावणारा होता.. आता पर्यंत खूप मुलींना पाहिल पण ही वेगळी होती.. हृदयात घर करून गेली. मी मोबाईल सोडून फक्त तिलाच बघत होतो की एक मुलगा आला आणि तिला घरात घेऊन गेला.""त्या दिवसानंतर माझं आयुष्यच बदललं. मला तिला सारखं बघण्याची ओढ वाटु लागली होती. तिचा चेहऱ्या मला सगळीकडे दिसु लागला होता.. हवी हवीशी वाटावी अशीच होती ती..""एक दिवस हिम्मत करून मी तिच्या घरी गेलो... बेल वाजवली