एक चुकलेली वाट - 5

(15)
  • 17.3k
  • 2
  • 9.6k

एक चुकलेली वाट भाग - ५ दिवसभर निरनिराळ्या प्रकारे चौकशी करूनही दिपकने तोंड उघडल नव्हतं. दमलेले देसाई आणि अनिकेत जरा बाहेर येऊन बसले. दीपक एवढा निगरगट्ट माणूस त्यांनी आजवर पहिला नव्हता. काही म्हणजे काहीच बोलत नव्हता आणि तसंही पोलिसांकडे फारसे काही पुरावे नसल्याने ते जबरदस्ती करू शकत नव्हते. संध्याकाळची उन्हं उतरून गेली होती. दिवसभराने पक्ष्यांसोबत माणसंही घराच्या ओढीने परतत होती. पक्षांच्या पंखांच्या फडफडीतून आणि माणसांच्या पावलाच्या आवाजाने त्यांची घरी जाण्याची घाई कळून येत होती. केवळ पोलीस स्टेशनमधल्या कोणाला घरी जावस वाटत नव्हतं. नंबरचा सुगावा लागल्यानंतर झालेला हर्ष, फुटल्यावर फुग्यातील हवा निघून जावी तसा निघून गेला. आता पुन्हा कुठून सुरुवात करावी ते