उलट्या पायांची म्हातारी - भाग एक

(18)
  • 40.9k
  • 1
  • 28k

“ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला. तिघांनीही आपापल्या सा