एक चुकलेली वाट - 2

(17)
  • 21k
  • 3
  • 14.2k

एक चुकलेली वाट भाग २ निशू, काही झालंय का ग..? अनिताने एकट्याच चाललेल्या निशाला हटकल. पाटील महाविद्यालयाच्या विस्तीर्ण आवारात मज्जा मस्ती करत हिंडणाऱ्या त्यांच्या नेहमीच्या ग्रुपला टाळून एकटीच गेटच्या दिशेने जाणाऱ्या निशाला पाहून अनिता धावत तिच्या मागे आली. अनिताच्या चार पाच हाकांना काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने निशाच्या पाठीवर थोपटल. अचानक झालेल्या स्पर्शाने निशा दचकली. मागे अनिताच आहे हे बघून तिला जरा हायस वाटलं. मागचे दोन दिवस ती अशीच वागत होती. अचानक सगळ्यांमध्ये येणं जाणं बंद केलं होत तिने. काही नाही ग..जरा घाई आहे मला तिला उत्तर द्यायचे टाळून निशा भराभर गेटमधून निघूनही गेली. काय झालंय हिला...?