जुळले प्रेमाचे नाते - भाग-६९

(22)
  • 8.3k
  • 1
  • 3.5k

तेवढ्यात निशांत एकदम माझ्या जवळ आला.. "शांत हो.. तो मागेच उभा आहे. तो ब्लॅक टीशर्ट हेल्मेट घातलेला मुलगा राजच्या घरातुन निघाल्यापासुन आपला पाठलाग करत आहे. मी लगेच मिस्टर गोखले यांना मॅसेज केला आहे. राज ने आपल्याला सर्वांचा एक ग्रुप केला आहे आणि मी त्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकला आहे." निशांतने मला हे सांगताच मी फक्त खाली पडायचे बाकी होते. मी बघण्याचा विचार करत असताना त्याने मला तस करू नकोस अस डोळ्यांनीच बजावलं..."नको बघुस त्याच्याकडे. त्याला कळलं नाही पाहिजे की आपल्याला तो आपला पाठलाग करत आहे हे कळलंय." निशांतच्या बोलण्याने मी हातात असलेला गरम चहा ओठांना लावला. आणि नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करू लागले. "तु राजच्या