पार - एक भयकथा - 4

(15)
  • 52.9k
  • 37.7k

पार - एक भयकथा भाग ४ रात्री अडीच वाजता मनीषाची थोडी झोप मोडली. अर्धवट झोपेतच ती अरविंदच्या खांद्यावर हात टाकायला गेली पण तिचा हात थेट बिछान्यावर पडला ती घाबरून उठली अरविंद शेजारी न्हवता. बाकी सगळे शांत झोपलेले होते.तीने हळूच मालती मावशीला उठवले दोघी अंगणात आल्या.“परसाकड पाहून येते ” मावशी घराजवळील परसाकडे बघायला गेल्या तिथे दरवाजा उघडा होता आत कोणीच न्हवते.रामन्ना आणि शिर्पाद पहाऱ्यावर बसले होते. बसल्या बसल्या त्यांचा डोळा लागला होता.“अरविंदला पहिला का ” तीने त्यांना विचारले.“साहेब साईट वर चाललो एवढंच बोलले बाकी काही बोलले नाय ” रामन्ना डोळे चोळत सांगू लागला.“ती बॅटरी द्या इकडे आणि घरात पोरं एकटीच आहेत