भारतीय सर्वेक्षण इतिहासातील सोनेरी पान: कर्नल लॅम्बटन सिद्धेश्वर तुकाराम घुले M.Sc.(Agri.)

  • 9.8k
  • 3.1k

२० जानेवारी हा दिवस भारतीय सर्वेक्षण इतिहासातील अधर्व्यू कर्नल लॅम्बटन यांचा स्मृतीदिन! दोनशे पंधरा वर्षांपूर्वी १० एप्रिल १८०२ या रोजी ब्रिटिश कर्नल विल्यम लॅम्बटन यांनी भारतीय सर्वेक्षण इतिहासातील साहसी, महत्वाकांक्षी आणि गणितीयदृष्ट्या किचकट सर्वेक्षणाची सुरुवात चेन्नईजवळच्या सेंट थॉमस पर्वतापासून केली. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होण्यासाठी चार दशकांचा प्रदीर्घ कालावधी लागला व हा सर्वेक्षण प्रकल्प हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण झाला. कर्नल लॅम्बटन यांनी अत्यंत काळजीपूर्वक सेंट थॉमस पर्वतापासून दक्षिणेस १२ कि.मी. अंतरावर भारतीय द्विपकल्पाच्या मध्यावर अक्षांश व रेखांश नोंदविण्यासाठी आधाररेषा निश्चित केली. साधारणपणे ७८० रेखांशाच्या व्यामोत्तर (दक्षिणोत्तर) भारतीय उपखंडातील २४०० कि.मी. अंतराचा परिसर "ग्रेट इंडियन आर्क ऑफ द मेरिडीयन" म्हणून ओळखला जातो. सर्वेक्षणाच्या