पार - एक भयकथा - 2

(14)
  • 53.2k
  • 41.5k

पार - एक भयकथा भाग - २ “बाय मनु दोन तासात तुम्हाला घ्यायला येतो,काही लागलं तर फोन कर” अरविंदने मनीषा आणि मालती मावशीला सकाळी गावाच्या बाजारात सोडले.“मम्मा आज बाबा आम्हाला त्याच्या साईट वर नेणार आहे ” खिडकीतून मान बाहेर काढून आर्या मनीषाला कौतुकाने सांगू लागली“हो माहितीये मला, बाबांन जवळच रहा जास्त लांब जाऊ नका ” आर्याने बाहेर काढलेली मान हाताने आत सारत मनीषाने मुलांना सुचना दिली आणि दोघी खरेदीला निघाल्या.“मावशी जास्त भाज्या नको घ्यायला फ्रीज नाही तर खराब होतील ”“बाजार काय तसा लांब नाय म्हनल तर मी बी येईन एकली, मोजक्या भाज्या अन किरणाच घेऊया ”दोघी खरेदी करू लागल्या. सगळं समान