माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 15

(4.6k)
  • 7.8k
  • 2
  • 3.1k

१५ हाऊ टू स्पीक! सारे काही अकल्पित घडले. मी येऊन बसलो आपल्या खोलीत. कसला तरी विचार करत बसलेलो. तर हळूच वैदेही आत आली. माझ्यापुढे हात दोन्ही पसरून म्हणाली, "मोडक, बघ ना, आय हॅव कम.." मी पाहिले तर तिच्या दोन्ही हातांवर मेंदी रंगलेली मस्त. "छान आहे हां. मस्तच!" "अजून काही?" "काही नाही. बाकीच्या सर्वांची झाली?" "हुं.." ती फणकाऱ्यात म्हणाली नि गप्प झाली एकाएकी. ती जायला निघणार इतक्यात कृत्तिका आली पाठोपाठ. "मोदका.. तुला इतकेही नाही कळत? नीट बघ ती मेंदी.." कृत्तिकाने वैदेहीचे हात समोर माझ्या समोर धरले. मी निरखून पाहिली मेंदी तर त्यात माझे नाव लिहिलेले. त्यानंतर जे झाले..