शोध चंद्रशेखरचा! - 1

(13)
  • 11.8k
  • 2
  • 7k

शोध चंद्रशेखरचा! १.---- विकीने आपली कार 'सावधान! घाट आरंभ!' या सूचनेच्या पाटीजवळ थांबवली. त्याच्या कानाजवळचे केस पांढरे झाले होते. बाकी वय सांगणाऱ्या खुणा शरीरावर कोठे दिसत नव्हत्या. पैसा आणि दारू, हीच काय ती त्याची दोन व्यसने होती. पैसा 'कमावण्यात' त्याला कधीच रस नव्हता. पण 'मिळवण्या' साठी तो अगणित फंडे करायचा. अनाथाश्रमातल्या बालपणाचे ओरखडे घेऊन तो जगला आणि वाढला होता. त्याला या जगाची भाषा चांगलीच आवगत झाली होती! कळायला लागल्यावर, रहीम चाच्यांच्या ग्यारेज मध्ये काम मिळाले. देशी विदेशी गाड्यांच