सवत... - २

(528)
  • 16.5k
  • 10k

ईशा टीव्ही जवळ गेली व टीव्हीचा स्विच बंद करून तिने वायर काडून टाकलं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपली...संध्याकाळ झाली, हरी घरी आला, घंटी चा आवाज ऐकून ईशा पटकन उठून आली, दार उघडताच ईशा हरी ला चिपकली...."अरे काय झालं, माझ्या ईशुला, खूप मिस केलं वाटतं मला"..."हो खूपच"..."बरं चल आत आधी"....हरी ईशा ला आत घेऊन आला...हरी ईशाला निरखून पाहत होता.... "ईशा काय झालं, तू जरा वेगी दिसतेस, घाबरलीस का परत"...."हो हरी"..... ईशा ने हरी ला सगळं सांगितलं, हरी ने शांत पणे सगळं ऐकून घेतलंसंध्या तितच होती आणि सगळं ऐकत होती..... सगळं ऐकल्यावर हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं... आणि हरी संध्याकडे बघायला लागलासंध्या ने