राधेय - पुस्तकानुभव

  • 27.9k
  • 1
  • 8.7k

लॉकडाउन_पुस्तक_वाचन राधेय लेखक - रणजित देसाई (अनुभव, समीक्षा, माहिती) "मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही." "जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध, अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे." "त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे." पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलेली वाक्यं कर्णाविषयी खूप काही सांगून जातात. आयुष्यभर ज्याला सूतपुत्र म्हणून हिनवण्यात आलं, पदोपदी अपमानित करण्यात आलं, कौंत्येय असूनही राधेय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णाची हि कहाणी रणजित देसाई यांनी जबरदस्त साकारली आहे. महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेचं लहान थोर अबाल वृद्धानमध्ये एक वेगळलंच स्थान आहे. त्याच्यामध्ये असलेल्या नानाविध गुणांनी अनेक लेखकांना त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी लिहिण्यासाठी भुरळ घातली आहे. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे, मृत्युंजयकार शिवाजी