एडिक्शन- पर्व दुसरे - भाग 27

  • 4.9k
  • 2.2k

प्रज्ञा जसजशी मोठी होऊ लागली तसतसा तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला ..हेच ते वय असत जेव्हा मूल बाहेरच्या जगात स्वतःचा आनंद शोधू लागतात ..तेव्हा त्यांना समजावून सांगण , त्यांच्यावर अधिक नजर ठेवण फार गरजेच होऊन जात ..पण प्रज्ञाचे आईवडील सोबत नसल्याने तिला बर वाईट यातला फरक सांगणार कुणीच लाभलं नाही आणि ती त्यालाच जीवन समजत जगू लागली . ..तिच्यासाठी सलीलच प्रेमच सर्व काही बनत गेलं ..पण ती हे विसरत गेली की प्रेम एका मर्यादेपर्यंत आनंद देऊन जात आणि जेव्ह प्रेम आपली मर्यादा तोडू लागत तेव्हा ते सर्व काही अस्ताव्यस्त करून जात ..व्यक्ती त्या नशेत काय करतो आहे हे त्याला