अजिंक्य तिचा हात धरून बाहेर निघाला तेव्हा सर्वांना वाटलं की तो मृणाललाच बाहेर काढणार पण त्यालाही बाहेर जाताना पाहून प्रज्ञा म्हणाली , " बाबा तुम्ही पण जाणार आहात ? ..नका जाऊ न आम्हाला तुमची फार गरज आहे ..विशेषतः मला !! " आणि अजिंक्य तिच्यावर हसत म्हणाला , " बेटा मला तुझा मुळीच राग आला नाही ..मान्य आहे की तुला खूप त्रास झाला पण विचार केल्यावर तुला लक्षात येईल की मी मृणालला घरी आणलं नसतंच तर यातलं काही घडलं नसत ..मुंबई शहरातच असतो तर सर्व काही छानं असत तेव्हा नकळत का होईना याला सर्वस्वी जबाबदार मी आहे आणि अप्रत्यक्षरित्या