एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 21

  • 5.7k
  • 2.2k

मृणालच्या शब्दांनी समीरला मिरची लागली आणि तो पाय काढत घराकडे पसार झाला ..आपण तिच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आणलं तरी तिच्या चेहऱ्यावर भीती नसून ती आणखीच कठोर झाली आहे हे पाहून तो संतापला ..त्याच डोकं पुन्हा एकदा गरगर फिरू लागल..डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले आणि नाईलाजाने पियुषला फोन लावला ...पियुषला फोन लावून त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं ...बराच वेळ झाला तरीही त्यांचं बोलणं सुरूच होत ..पियुष त्याला बरच काही समजावत होता पण तो काहीच एकूण घ्यायला तयार नव्हता ..त्याला तर फक्त मृणालने त्याच्या पायावर पडून नाक घासण हवं होतं ..पियुषणे त्याला दोन गोष्टी सांगितल्या होत्या आणि ते दोन्ही पर्याय एकूण