भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २५

  • 5.7k
  • 1
  • 2.1k

" डब्बू आणि मी .... बालमित्र , त्यांचे घर माझ्या सोसायटीपासून १० मिनिटांवर, त्यामुळे शाळेत जाताना एकत्र जायचो, त्याची आई आणि माझी आई मैत्रीण... माझ्या आईला तर माझ्यासाठी वेळ नसायचा. डब्बूची आई मला शाळेत घेऊन जायची. घरी सुद्धा सोडायची. तेव्हापासून ओळख. एका वर्गात होतो. मला ना तेव्हा डब्बू मुका वाटायचा. कधीच बोलायचा नाही. शाळेत सुद्धा टीचरने काही विचारलं , तरी बोलायचा नाही. का ते अजूनही माहित नाही. पण आधीपासूनच हुशार..... चित्रकला , स्केचिंग जास्त आवडायची. पावसात भिजायचा नाही, पाऊस बघायला आवडायचे त्याला. लहानपणीच या सर्वांचे वेड ... तेव्हाही एकटाच रहायचा. त्याचे मित्र का नाहीत .... कळलं का आता...... अबोल त्यात