तो मीच विजय....हं! तर मी विजय.... होय, मी विजयच.... माझ्या जीवनावर विजय मिळवणारा... मी विजय... मला तरी हे माझं नाव आता सार्थक झाल्यासारखं वाटतंय. अगदी सार्थ सुख-समाधान... आणि.... सारं काही.... शब्दही उणे भासत आहेत. माझ्या मनातील कप्प्यात अनेक तरंग उमटत आहेत. भावभावनांचा कल्लोळ दाटून येतो आहे. काळजातील अनेक वेदनांचा आलेख मी आठवून पाहतो आहे. त्या अस्पष्ट धूसर आठवणी का असेना? निव्वळ आठवणीचा समुद्र...तसे पाहता समुद्र या शब्दातच अगदी माझं जीवन सामावले आहे. या भुतलावावर असलेली एकमेव ही वस्तू समुद्र... या विश्वातील सर्व मानवाच्या जीवनाला वलय देणारी ही एक मला निरामय वस्तु भासते आहे. होय समुद्र! याबाबत काय बोलावं? अथांग पाण्याचा